राष्ट्रीय महिला दिनानिमित्त *सामाजिक रूढी व परंपरांना कलाटणी देऊन महिलांनी नवीन बदल घडवावा: सुवर्णरेखा पाटील*

राष्ट्रीय महिला दिनानिमित्त 

*सामाजिक रूढी व परंपरांना कलाटणी देऊन महिलांनी नवीन बदल घडवावा: सुवर्णरेखा पाटील*

वरोरा 
श्याम ठेंगडी 

       महिलांनी आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहून समर्थपणे, ताटमानाने सामाजिक जीवनात उभे राहावे हा महिला दिनाचा हेतू आहे. परिस्थितीप्रमाणे सर्वच स्तरांवरील महिलांमध्ये खूप बदल होतो आहे.आर्थिक स्तर उंचावल्याशिवाय महिला आपली उन्नती करू शकत नाही. सामाजिक रूढी परंपरांना कलाटणी देऊन नवीन बदल घडविण्यात महिला पुढे सरसावल्या आहेत. महिलांनी सर्व क्षेत्र पादाक्रांत केली हे वाखाण्याजोगे असले तरी आपले कुटुंब एकसंघ ठेवत मुलांना वेळ देणे,मुला-मुलींना पुढील जीवनासाठी आत्मनिर्भरतेचे प्रशिक्षण देणे, कुटुंबाला व्यसनमुक्त ठेवणे आवश्यक आहे. महिला दिनानिमित्त या सर्व बाबींकडे महिलांनी लक्ष द्यावे असा संदेश चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी सचिव, स्वयंसिध्दा महिला नागरी सहकारी बँकेच्या संस्थेच्या तसेच सावित्रीबाई फुले महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा  सुवर्णरेखा पाटील यांनी महिला दिनानिमित्त महिलांना दिला आहे.
   ग्रामीण भागातील महिलांमध्ये वैचारिक जागृती करणे आवश्यक आहे. आरोग्य सामाजिक सुरक्षा, संगणीकरण युगातील फायदे व तोटे, आर्थिक  सुबक्ता येत असताना त्यातील धोक्याबाबत महिलांना जागृत करणे गरजेचे असल्याचे सांगत त्या म्हणाल्या सामाजिक पावित्र्य टिकवण्यासाठी महिलांनी हातात " आसूड " घेणे महत्त्वाचे आहे.परिस्थितीत बदल होणार असला तरी त्यासाठी आपल्याला सावित्रीच्या लेकी, जिजाऊ, अहिल्याबाई होणे हेच या युगासाठी आपले योगदान राहील.
 दहा वर्षांपूर्वी महिलांच्या मानेसिकतेचा विचार व आता नवीन युगातील वाटचालीतील त्यांचा विचार याचा अभ्यास केला तर असे दिसते असे लक्षात येते की महिलांचा स्वतःबाबत आत्मविश्वास पक्का झाला असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
लग्न झाले म्हणजे आपण सक्षम झालो असे नसून आता सगळीकडे वैचारिक परिपक्वता निर्माण करण्यासाठी सामाजिक प्रशिक्षण केंद्र उभारून समाज जागृतीसाठी चर्चा सत्र घेण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली.
 *नवी युगाची नवी पावले करूया मजबूत/*
आम्ही असू भारतीय नारी, जगामध्ये घेऊ उंच भरारी/ *तेजोमय ध्वज ढोलवित, आकाशी गाऊ ललकारी /*
       असे सांगत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Comments