संघर्षात न डगमगता महिलांनी सामाजिक तसेच आर्थिक क्षेत्रात समोर यावे श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर.
संघर्षात न डगमगता महिलांनी सामाजिक तसेच आर्थिक क्षेत्रात समोर यावे श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर.
फक्त बातमी
वरोरा
केवळ शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील महिला सुद्धा संघर्षातून सामाजिक तसेच आर्थीक क्षेत्रात पुढे येत आहेत हे बघून आनंद वाटतो असे प्रतिपादन खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर जी एम आर वरलक्ष्मी फॉउंडेशन व समृद्धी लेडीज क्लब द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात केले. दिनांक ६ मार्च रोजी मांजर खुर्द येथे जी एम आर वरलक्ष्मी व समृद्धी लेडीज क्लब द्वारे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार उपस्थित होत्या तसेच विशेष अतिथी म्हणून वरोरा येथील विभागीय पोलीस अधिकारी नियोमी साटम व समृद्धी लेडीज क्लब च्या अध्यक्ष श्रीमती मेधा देशपांडे विशेषतः उपस्थित होत्या
या कार्यक्रमात माननीय खासदार यांनी स्वतःच्या जीवनात आलेल्या वैयक्तिक अडचणींवर मत करून सामाजिक तसेच राजकीय जीवनात कसे पुढे आले या संधर्भात महिलांशी संवाद साधला तसेच या प्रसंगी महिला बचत गटातून आर्थिक क्षेत्रात पुढाकार घेतलेल्या महिलांचे कौतुक केले. विशेष अतिथी म्हणून नियोमी साटम यांनी महिलांनी स्वतःला कौटुंबिक कामात स्वतःला गुंतवून न ठेवता सामाजिक तसेच वैयक्तिक विकासासाठी पुढे येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. या प्रसंगी त्यांनी राणी अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई यांचे उदाहरण दिले.
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक जागतिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील महिलांच्या कामगिरी, योगदान आणि प्रगतीचा सन्मान केला जातो. महिला हक्क, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या संघर्षांवर प्रकाश टाकून, लैंगिक समानतेच्या मार्गाचे पालन महिला तसेच पुरुष यानी करावे असे आवाहन या प्रसंगी श्रीमती मेधा देशपांडे यांनी केले.
या कार्यक्रमात विशेषतः जी एम आर वरलक्ष्मी फॉउंडेशन द्वारे चालविल्या जाणाऱ्या प्रतिभा लायब्ररी तुन विशेष परीक्षा उत्तीर्ण करून शाशकीय नोकरी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचे सत्कार करण्यात आला तसेच महिला बचत गट द्वारे वैयक्तिक तसेच सामूहिक व्यवसाय करणाऱ्या महिलांचे मनोगत तसेच त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमाचे शनी महिला बचत गटाचे उत्पादनांचे प्रदर्शनी लावण्यात आलेली होती.
जीएमआर वरोरा एनर्जी लि. थर्मलचे सीओओ आणि एसएलसीचे अध्यक्ष श्री. धनंजय देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे आणि विशेष पाहुण्यांना त्यांच्या सर्वोच्च कामगिरीबद्दल सत्कार केला.
सर्व महिला कर्मचारी, जीएमआर वरोरा एनर्जी लि. या कार्यक्रमात सीएसआर कार्यक्रमातील स्वयंसेवक, शाळेतील शिक्षिका, विविध गावांतील बचत गटातील महिला तसेच सभोवतालची गावातील महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती अस्विनी गयधर तसेच प्रास्ताविक श्रीमती अंजली भावे यांनी केले.
Comments
Post a Comment