वरोरा शहरात गुढीपाडवा उत्साहात साजरा # रणरागिनींची लक्षवेधी बुलेट रॅली # जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

वरोरा शहरात गुढीपाडवा उत्साहात साजरा 
 # रणरागिनींची लक्षवेधी बुलेट रॅली 
# जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
वरोरा दिनांक 31 मार्च 

      गांधी उद्यान योग मंडळ व गुढीपाडवा उत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित गुढीपाडवा उत्सव वरोरा शहरात विविध कार्यक्रमांच्या आयोजन करून साजरा करण्यात आला.
      हिंदू नववर्षाच्या निमित्याने स्थानिक गांधीसागर तलावाचे प्रवेशद्वारावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यावेळी महिलांनी काढलेली टू व्हीलर व बुलेट रॅली मुख्य आकर्षण ठरले. खासदार प्रतिभा धानोरकर, आ करण देवतळे यांचे सह वरोरेकर मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाले होते.
   बैलबंडीवर भव्य गुढी उभारून शहरातील मुख्य मार्गावरून गुढीपाडव्याची रॅली काढण्यात आली. यामध्ये आदिवासी नृत्य, ढोल ताशा ध्वज पथक, वारकरी पथक,  महिलांचे लेझीम पथक आकर्षक होते. नागरिकांनी या मार्गावर रांगोळ्या काढून नववर्षाचे स्वागत केले. विविध सामाजिक संघटनांनी सरबत आणि अल्पहाराचे स्टॉल लावले होते.
    सायंकाळी आंबेडकर चौक येथे संगीत रजनीचे आयोजन आणि वरोरारत्न जीवनगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील होते. सत्कारमूर्ती प्रसिद्ध उद्योजक प्रकाश मुथा, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य वामन तुर्के, योगाचार्य प्रकाश संचेती, गांधी उद्यान योग मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नेमाडे आणि गुढीपाडवा आयोजन समितीचे अध्यक्ष नितेश जयस्वाल यांची उपस्थिती या वेळी होती.  
  आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. श्रीकांत पाटील यांनी गांधी उद्यान योग मंडळाच्या कार्याचा आढावा घेत माणसांना जोडण्याचं काम योग मंडळ करीत असून त्यामुळे शहरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाल्याचे ते म्हणाले. वामन तुर्के यांनी वरोरा शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा आलेख रसिकांच्या पुढे मांडला. याप्रसंगी प्रकाश मुथा यांना फटाक्याच्या आतिषबाजीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना जगात माणुसकी हा एकच धर्म असून प्रामाणिकपणे काम केल्यास आयुष्याचं भलं होतं असे सांगत,  माणसाने सकारात्मक विचार, जिद्द आणि सचोटी याचा अवलंब करावा असे ते म्हणाले. भविष्यात सुसज्ज गोरक्षण उभे करण्याचा मानस त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
     कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रशांत खुळे यांनी केले. डॉ. पल्लवी ताजणे यांनी मानपत्राचे वाचन तर नरेंद्र नेमाडे यांनी आभार मानले. रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती कार्यक्रमाला होती. गांधी उद्यान योग मंडळाचे मनोज कोहळे, आनंद गुंडावार, शैलेश शुक्ला, गणपत भडगरे, निलेश शुक्ला, योगेश डोंगरवार, प्रमोद गिल्लोरकर, प्रवीण सुराणा, जयंत मारोडकर,  शशी चौधरी आदी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता अथक परिश्रम घेतले.  
 

                           ईद मुबारक

Comments