कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अविश्वास ठराव सभा पुढे ढकलण्यासाठी विरोधकांचे निवेदन. सहा महिने अविश्वास आणता येणार नाही डॉक्टर देवतळे .

कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अविश्वास ठराव सभा पुढे ढकलण्यासाठी विरोधकांचे निवेदन. 

सहा महिने अविश्वास आणता येणार नाही 
डॉक्टर देवतळे .
विरोधक तोंडावर पडले.

वरोरा 
चेतन लूतडे 


वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 फरवरी 2025 ला सभापती डॉक्टर देवतळे यांच्यावर बारा सदस्यांचा अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता. पंधरा दिवसानंतर 5 मार्चला अविश्वास ठराव पारित करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सभाध्यक्ष तहसीलदार यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती.
मात्र या सभेच्या आधीच कृषी उत्पन्न बाजार समितीचे मापारी गटाचे सदस्य पांडुरंग झाडे यांचे संचालक पद रद्द झाल्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले. या पत्रात 10 फरवरी च्या राईट पिटीशन नंबर ६३२/२०२५ झालेल्या आदेशानुसार  ,जिल्हा उपनिबंधक सहसंस्था 14 फरवरी च्या पत्रानुसार, 15 फरवरी च्या संचालक मंडळाच्या ठरावानुसार संचालक पदी पात्र करून घेण्यात आले होते. याबाबतच्या  संपूर्ण बाबी संबंधित अधिकाऱ्याकडून लपवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. झाडे यांचा अपात्रतेचा आदेश चुकीचा काढल्याने विरोधकांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे पिटीशन क्रमांक 221/ 2024 दाखल करून न्यायालयात दाद मागितली आहे. 
त्यामुळे ही सभा रद्द करून पुढील सभा आठ दिवसानंतर घेण्यात यावी या आशयचे पत्र विरोधकांनी सभा अध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे आज कोणतेही मतदान झालेले नाही. 
कृषी उत्पन्न बाजार समितीचे 12 सदस्य 
जयंत टेंमुर्डे, राजेंद्र चिकटे ,नितीन मते , हरीश जाधव ,दिनेश कष्टी ,गणेश चवले ,निरज गोठी, प्रवीण मालू ,कल्पना टोंगे ,अभिजीत पावडे ,पुरुषोत्तम पावडे ,पांडुरंग झाडे. विरोधी गटाकडून उपस्थित होते.

विरोधकांना नियमानुसार सहा महिन्यापर्यंत अविश्वास ठराव सभा घेता येणार नाही.

मापारी सदस्य झाडे यांना अपात्रतेचा आदेश दिल्याने बारा सदस्य विरोधकांजवळ जूळले नाही. त्यामुळे सभा अध्यक्षांना आठ दिवसाची मुदत वेळ विरोधकांनी मागितली आहे. मात्र देवतळे गटाचा यावर आक्षेप असून सदस्य संख्या नसल्यामुळे वाढीव दिवस मागत असल्याची टीका केली आहे.

विशेष सभेच्या सभाध्यक्षांनी दोन्हीही गटातील सदस्यांना बोलावून सभे मध्ये निवेदन दाखल करायला पाहिजे होते. त्यांच्या समक्ष निवेदनावर त्यांच्या सह्या घ्यायला पाहिजे होत्या. विरोधका जवळ बारा सदस्य नव्हते त्यामुळे हा अविश्वास ठराव बारगळला आहे. पोटनियमानुसार  आता सहा महिने अविश्वास प्रस्ताव घेऊ शकत नाही. विरोधक तोंडावर पडले आहे. असे मत सभापती डॉक्टर देवतळे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत सभापती देवताळे यांचे स्वागत केले.
.................................................


Comments