महिलांनी स्वतःला कौटुंबिक जबाबदारी बंदिस्त करून घेऊ नये : नयोमी साटम*

*महिलांनी स्वतःला कौटुंबिक जबाबदारी बंदिस्त करून घेऊ नये : नयोमी साटम*

वरोरा 
श्याम ठेंगडी 
        कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना महिलांनी स्वतःला त्यात बंदिस्त करून न घेता इतिहासातील कर्तुत्वान आदर्श महिलांच्या कार्यातून प्रेरणा घेत सामाजिक कार्यात स्वतःला सहभागी करून घ्यावे. सामाजिक क्षेत्रात महिलांना मान मिळतो. समाजाला दिशा देण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. याचा उपयोग एक चांगला व आदर्श समाज  निर्मितीसाठी प्रयत्न करावा असा संदेश असा संदेश चंद्रपूर जिल्ह्याच्या  जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक व वरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी महिला दिनानिमित्त आज आमच्या प्रतिनिधी जवळ दिला. 
      नवीन पिढीला प्रेरणा देत त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याची जबाबदारी ही महिलांवर मोठ्या प्रमाणावर आहे.युवतींनी स्वतःतील कार्यक्षमता ओळखून त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्राची निवड करून एक आदर्श  समाजासाठी आपले कार्य व आचरण करावे. असे केल्यास पुरुषही महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देतील अशी प्रतिक्रिया त्यांनी याप्रसंगी दिली.
    ‌ समाजासाठी चांगले कार्य करत एक विधायक विचार देत ज्यातून वाईट मार्गावर जाणाऱ्या नवीन पिढीला थांबवता येईल. असा आपला प्रयत्न असून शक्य असल्यास त्यांना योग्य न्याय देणे यास प्राधान्य दिले पाहिजे. ग्रामीण भागातील युवक युवतींमध्ये एक विधायक विचार रुजवण्याची व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची गरज असून यासाठी आपण प्रयत्न  करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

    सिंधुदुर्ग मूळगाव असलेल्या नयोमी साटम यांचे प्राथमिक ते महाविद्यालयीन  शिक्षण मुंबईतील बोरिवली येथे झाले. त्यांनी 2020 मध्ये  दिलेल्या यूपीएससी परीक्षेचा निकाल 2021 मध्ये लागला. पहिल्याच  प्रयत्नात त्यांना या परीक्षेत यश मिळाले. यानंतर हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी या संस्थेत त्यांनी प्रशिक्षण घेतले.यानंतर 2023 मध्ये सहा महिन्यासाठी परीक्षाविधीन पोलीस अधिकारी म्हणून त्यांची सोलापूर येथे   नेमणूक करण्यात आली. यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून प्रथम त्यांची वरोडा येथे नेमणूक झाली हे विशेष.
       नयोमी साटम यांचे आई वडील उच्च विद्या विभूषित असून आई ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये एम एस सी तर वडील सीए आहेत. दोघेही नोकरी करत असून त्यांची लहान बहीण मेडिकलच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. आपल्या मुलीने जिल्हाधिकारी व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. परंतु पहिल्याच प्रयत्नात आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यातच महाराष्ट्र राज्यात त्यांची निवड झाल्यामुळे वडील आनंदी झाले. आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्काराचे शिदोरी घेऊन आपण आपल्या व्यवसायाला योग्य न्याय देणार असल्याची माहिती त्यांनी दिली
          26 वर्षीय नयोमी साटम यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षकाची  स्वीकारलेली जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पाडत असून त्यांच्या एक वर्षाच्या कालखंडात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा  शोध लावला आहे. आपल्या कार्याने त्यांनी समाजात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ठसा उमटवलेला आहे.
.............................................

महिला दिन शुभेच्छा :

🌸 सशक्त आहेस, समर्थ आहेस,
तुझ्यामुळेच ही सृष्टी सुंदर आहे!
तू प्रेम, तू प्रेरणा, तूच शक्ती,
तुला सलाम, हेच आमचे भक्ती! 🌸

स्त्रीशक्तीला मान देऊया,
महिला दिन साजरा करूया!

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Comments