वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात विनामुल्य CET MOCK TEST चे युवासेनाव्दारा आयोजन**आनंद निकेतक महाविद्यालय वरोरा व यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे परीक्षेचे आयोजन**472 विद्यार्थ्यांची परीक्षेला उपस्थिती*
*आनंद निकेतक महाविद्यालय वरोरा व यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे परीक्षेचे आयोजन*
*472 विद्यार्थ्यांची परीक्षेला उपस्थिती*
वरोरा
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय उध्दवसाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आदरणीय आदित्य उध्दवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतुन विनामुल्य NEET-UG MEDICAL, MHT-CET (ENGINEERING, PHARMACY, LAW) CET MOCK TEST महाराष्ट्र राज्यात घेण्यात आली.
याचाच एक भाग म्हणून 75-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात युवासेना पुर्व विदर्भ विभागीय सचिव निलेश बेलखेडे, जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात युवासेना चंद्रपूर जिल्हा अधिकारी रोहण कुटेमाटे तसेच युवासेना वरोरा विधानसभा पदाधिकारी यांच्या नेतृत्वात भद्रावती व वरोरा येथे सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. परीक्षेला विद्यार्थ्यांनी उर्त्फुत सहभाग नोंदवीला. आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन परीक्षा केन्द्र येथे 364 विद्यार्थी तसेच यशवंतराव शिंदे महाविद्यालय भद्रावती परीक्षा केन्द्र येथे 108 विद्यार्थी सराव परीक्षेला बसले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशंसा प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
परीक्षेच्या यशस्वीतेकरीता वरोरा विभागात युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक मनिष जेठानी, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, उपजिल्हा अधिकारी शरद पुरी, वरोरा तालुका संघटीका सरला मालोकर, युवासेना विधानसभा अधिकारी अभिजीत कुडे, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रामानंद वसाके, प्रिती कांबळे, जयश्री फाले तसेच भद्रावती विभागामध्ये युवासेना समिर बलकी, कुणाल कुटेमाटे, आकाश नवघरे, कुंदन चौधरी, दिपेश गुरुनुले, हर्षल कामडी आदीनी मोलाचे सहकार्य केले.
युवासेना जिल्हा अधिकारी व पदाधिकारी यांनी परीक्षेसाठी निशुल्क महाविद्यालय उपलब्ध करुन दिल्याबद्दल आनंद निकेतन महाविद्यालय तसेच यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे निस्वार्थभावनेने विद्यार्थ्यांच्या हिताकरीता सहकार्य केल्याबाबत आभार व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी सराव परीक्षेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपुर्वक अभिनंदन केले तसेच ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व युवासेना पदाधिकारी तथा शिवसैनिकांची प्रशंसा करीत आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment