चंद्रपूर, दि. 2 एप्रिल : क्रीडा व युवक सेवा संचानालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घुघुस येथे राज्यस्तरीय बुडो मार्शल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागातून जवळपास 100 विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करून प्रथम स्थान प्राप्त केले व आपल्या विभागाचे नाव राज्यस्तरावर पोहचविले.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. रामेश बोरकुटे तर प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, घुग्घुसचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय ढोबळे, बुडो मार्शल आर्टचे सिहान लहू पारवे, विवेक बोढे, सोमेश्वर येलचलवार, विनय बोढे, एलिजा बोरकुटे आदी उपस्थित होते.
पंच म्हणून स्पर्धेला लहू पारवे, प्रवीण घुगे, सुरेश जाधव, सचिन पट्टेकर, अभिजित हरपळे, संतोष कुलकर्णी, शैलेश मोटघरे, राजेंद्र जंजाळे, अमोल युवनाते, प्राजक्ता सोनवणे, विशाल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत विपुल नेमराज कावडकर प्रथम, आदित्य संदीप पाटील द्वितीय तर जीत निलेश भोईर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे मुख्य आयोजक तथा बुडो मार्शल आर्टच्या जिल्हा प्रमुख ज्योती मानुसमारे यांनी स्पर्धेचे आयोजन केले. कोषाध्यक्ष राहुल गौरकार, सह सचिव सुबोध आलेवार यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.
००००००
Comments
Post a Comment